“या वर्षापासून जिम लावतो रे” संघटनेतर्फे ‘सचिन अतुलकर’ यांचा जाहीर सत्कार !!

“या वर्षापासून जिम लावतो रे” संघटनेतर्फे ‘सचिन अतुलकर’ यांचा जाहीर सत्कार !!

आज इथे जमलेल्या तमाम, विराट, असंख्य लोकांसमोर “या वर्षापासून जिम लावतो रे” संघटनेतर्फे आम्ही ‘सचिन अतुलकर’ यांचा जाहीर सत्कार करत आहोत मंडळी.

टाळ्या !!! टाळ्या !!! टाळ्या !!!


तर बंधू आणि त्यांच्या बहिणींनो, कसली भारी बॉडी कमावलीये लेकानं. भाऊ अवघ्या २२ व्या वर्षी आयपीएस अधिकारी झाले. ड्युटीवर कार्यरत असूनसुद्धा त्यांनी आपल्या शरीराची खास काळजी घेतल्याबद्दल त्यांचे आधी तर मी सर्वांच्या देखत कौतुक करतो.

स्रोत

मंडळी आपल्या इकडे पोलीस म्हटलं की मोठाली ढेरी घेऊन फिरणारा माणूस डोळ्यासमोर येतो.  पण ही इमेज मोडीत काढण्याचं काम सचिन अतुलकर भाऊंनी केलंय. सचिन अतुलकर म्हटलं की आम्हाला अजय देवगणचा सिंघम आठवतो, सल्लूचा ‘दबंग’ आठवतो, अजून विचार केला की हृतिक पण आठवतो. हा बदल घडवून आणलाय आपल्या उज्जैन येथे कार्यरत असलेल्या सचिन भाऊंनी.
स्रोत

सोशल मिडीयावर आपल्या शानदार, दमदार बॉडीने त्यांनी आपली शान वाढवली आहे, अन ते मुळात हँडसम हायत.. त्यामुळं चर्चा तर होणारच राव!! फिटनेसबरोबर त्यांना घोडेस्वारी आवडते. राव २०१० मध्ये त्यांना घोडेस्वारीसाठी गोल्ड मेडल मिळालंय. 

अशा आपल्या डॅशींग सचिन भाऊंकडून आपण सर्वांनी शिकलं पाहिजे. दर वर्षी जिम लावूया असं म्हणत सकाळी उठण्याचा कंटाळा करणारे आपण कुठे आणि हा आपला सिंघम कुठे राव!!

मंडळी पुन्हा एकदा अखिल भारतीय “या वर्षापासून पासून जिम लावतो रे’ संघटनेकडून सचिन अतुलकर यांचे मी अभिनंदन करतो.

धन्यवाद !!