मंडळी एक जमाना असा होता, जेव्हा आमीर मिस्टर परफेक्शनिस्ट नव्हता की सलमान बॉलीवूडचा ‘भाय'!! चित्रपटसृष्टी आता जशी आहे, तेव्हा तशी नव्हती. या बड्या स्टार्सकडे तेवढं स्टारडम नव्हतं. मंडळी, या लोकांनी त्या काळात केलेल्या जाहिराती या तेव्हा जाहिराती असल्या तरी आजच्या काळात एक निव्वळ मनोरंजन आहे.
गब्बर म्हणून ज्याची दहशत आता जाणवते तो गब्बर सिंग बिस्कीट विकताना दिसत आहे, शत्रुघ्न सिन्हा चक्क बॅगपायपरची जाहिरात करत आहे, विनोद खन्नासारखा स्टायलिश माणूस घोड्यांसोबत सिंथॉलची जाहिरात करताना दिसत आहे....थांबा थांबा थांबा...आम्ही काय सांगतो बसलोय, तुम्हीच बघा की राव !!















