आज एक रुपयाच्या नोटेला १०४ वर्ष पूर्ण झाली. आज पासून ठीक १०४ वर्षांपूर्वी म्हणजे १९१७ साली पहिल्यांदा एक रुपयाची नोट चलनात आली. या नोटेवर डाव्या बाजूला कॉईनच्या आकारातील इंग्लंडचा राजा ‘जॉर्ज पंचम’ चा फोटो होता. खरं तर इंग्रजांनी १८६१ साली चलनी नोटा भारतात आणल्या पण १ रुपयाची नोट यायला अजून बराच काळ जाणार होता.
मंडळी, आज या निमित्त वाचूयात या सामान्य नोटेचा असामान्य इतिहास !!


