या वर्तुळातला नेमका अंक ओळखूनच दाखवा. पाहू बरं कुणाला नेमका ओळखता येतो ते!!

या वर्तुळातला नेमका अंक ओळखूनच दाखवा. पाहू बरं कुणाला नेमका ओळखता येतो ते!!

ऑप्टिकल इल्युजन म्हणजे दृष्टीभ्रम हा अनेक कारणांनी डोक्याला खुराक असतो. दृष्टीभ्रम काही काळासाठी का होईना, पण माणसाला गुंतवून ठेवतो. त्याचं कोडं सुटलं समाधान मिळते आणि नाहीच सोडवता आले तरी तितका वेळ मनोरंजन तरी होते.

याच कारणाने नवनवी ऑप्टिकल इल्युजन्स सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि लोकही त्यात आपली डोक्यालिटी ओतताना दिसतात. सध्या इंटरनेटवरील मंडळी अशाच एका इल्युजनने डोकं खाजवताना दिसत आहेत.

या दृष्टीभ्रमात काळ्या पांढऱ्या रंगातली समकेंद्री वर्तुळं आहेत. हे काळे-पांढरे पट्टे कमी की काय म्हणून त्यात काही अंकही आहेत. आता या वर्तुळात नेमके किती नंबर आहेत हे तुम्हाला ओळखायचे आहे. कुणाला यात वेगळे अंक दिसतील, तर कुणाला आणखीच वेगळे दिसतील. याच कारणाने हे इल्युजन व्हायरल होत आहे. एवढेच काय तुम्ही स्वतः जरी जवळून बघितले तर वेगळा नंबर दिसेल, तर मोबाईल थोडा दूर धरला तर वेगळा नंबर दिसेल.

यात एखाद्याला ५२८आकडा दिसेल तर दुसऱ्याला १५२८३ दिसत आहे. यात एका ट्विटर युझरने नंबर ओळखण्यासाठी एक ट्रिकही सांगून ठेवली आहे. ती म्हणजे नोटिफिकेशन बार जर वरून थोडा खाली ओढला तर स्क्रीन थोडी ब्लर होते आणि खरा आकडा दिसण्यास मदत होते.

तुम्हाला यात कुठला क्रमांक दिसतो हे आम्हाला कॉमेंटबॉक्समध्ये कळवा. बघू कुणाचे उत्तर बरोबर येते...

उदय पाटील