या पाकिस्तानी नवरदेवाने केलं स्वतःच्याच लग्नात लाईव्ह रिपोर्टिंग...व्हिडीओ पाहिला का ??

या पाकिस्तानी नवरदेवाने केलं स्वतःच्याच लग्नात लाईव्ह रिपोर्टिंग...व्हिडीओ पाहिला का ??

काही दिवसांपूर्वी एका पाकिस्तानी नवरदेवाने ‘अंडरटेकर’च्या स्टाईलमध्ये मंडपात एन्ट्री मारली होती. त्याला काही दिवस होतात न होतात, तोच नवीन बातमी आलीय. बातमी अशी आहे की एका पत्रकाराने आपलं लग्न यादगार बनवण्यासाठी चक्क लग्नातच ‘लाईव्ह रिपोर्टिंग’ केलं आहे.

नवरदेव हा ‘सिटी 41’ या पाकिस्तानी न्यूज चॅनेलचा पत्रकार आहे. त्याने आपला पत्रकारिता हा पेशा स्वतःच्या लग्नातही वापरला. एखाद्या सेलिब्रिटीच्या लग्नात ज्या प्रकारे माणसांच्या मुलाखती घेतल्या जातात, अगदी तशाच प्रकारे या महाशयाने प्रत्येकाची मुलाखत घेतली. आई, सासू, सासरे आणि खुद्द आपल्या होणाऱ्या पत्नीलाही त्याने प्रश्न विचारले. बूम माईक पकडून मुलाखत घेणारा नवरदेव लोकांनी पहिल्यांदाच पाहिला असेल.

मंडळी, हे सगळं कव्हरेज अगदी लाईव्ह चाललं होतं. पाकिस्तानमध्ये लग्नात असं काही तरी भन्नाट करण्याचा ट्रेंड आलेला दिसतोय. लग्नात वेगळ्या पद्धतीने एन्ट्री मारण्यापर्यंत तरी ठीक होतं.. पण एका पत्रकाराने स्वतःच्याच लग्नाचं लाईव्ह कव्हरेज पहिल्यांदा केलं असेल.

तुम्हीसुद्धा हा व्हिडीओ पाहा राव...

आणखी वाचा :

पाकिस्तानच्या नवरदेवाने 'अंडरटेकर'च्या स्टाईल मध्ये मारली एन्ट्री...व्हिडीओ बघून घ्या राव !!