निळ्या बॉर्डरची पांढरी साडी, फक्त मदर टेरेसांचीच !!!

निळ्या बॉर्डरची पांढरी साडी, फक्त मदर टेरेसांचीच !!!

मदर टेरेसा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर पांढऱ्या साडीतली एक स्त्री उभी राहते, डोक्यावर पदर आणि पदराला असलेल्या तीन निळ्या पट्ट्या. ही साडी म्हणजेच मदर टेरेसा अशी आपल्या मनात ओळख आहे. पण याच प्रकारची साडी आता आपल्याला ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ यांच्या परवानगी शिवाय वापरता येणार नाही राव. का ? चला जाणून घेऊ !!

Image result for mother teresaस्रोत

तर असं आहे की, मदर टेरेसा यांच्या या खास साडीला ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ची  'इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी' असल्याचा दर्जा मिळाला आहे. भारताच्या ‘ट्रेड मार्क्स रजिस्ट्री’ अंतर्गत या साडीचं रजिस्ट्रेशन झालं आहे. त्यानुसार निळ्या बॉर्ड‌र‌ची ही साडी आता एक खास ‘ट्रेडमार्क’ बनली आहे. खरं तर ही फक्त एक साडी नसून मिशनरीज ऑफ चॅरिटी यांचा तो गणवेश आहे आणि मदर टेरेसा यांच्या कार्याला १९४८ साली सुरुवात झाल्यापासून ती वापरात आहे. काही लोक या साडीचा उपयोग आर्थिक फायद्यासाठी करून घेत असल्याचं दिसल्यानंतर साडीचा हा पटर्न रजिस्टर करण्यात आला आहे. यातून अप्रत्यक्षरीत्या मदर टेरेसा यांच्या नावाचा अवैध उपयोग होत होता.

स्रोत

पांढरी साडी आणि निळी बॉर्ड‌र‌, तसेच त्यानंतरच्या दोन बारीक निळ्या पट्ट्या असा हा पेहराव आता फक्त मिशनरीज ऑफ चॅरिटी यांच्या परवानगीने वापरता येईल.  पण समजा राव उद्या बायको म्हणाली की मला तशीच साडी हवी तर?.. ती वापरता येईल का? तर वापरता येईल.  कारण खाजगी आयुष्यात या प्रकारची साडी नेसण्यास बंदी नाही.  तर याचा उपयोग सामाजिक आणि आर्थिक कार्यात करण्यावर बंदी असेल, तसेच हा रंग वापरण्यावरही काही बंधन नाहीय.  म्हणजे काय,  साडीची बनावट (Pattern) आणि निळा रंग हे अगदी हुबेहूब वापरता येणार नाहीत.

खरंतर १२ डिसेंबर, २०१३ रोजी रजिस्ट्रेशनसाठी अर्ज करण्यात आला होता. त्यानंतर ३ वर्षांनी अनेक कायदेशीर बाबी लक्षात घेतल्यानंतर अखेर साडीची नोंद झाली आहे.

यावर आमच्या मनात असा विचार आला की उद्या करुणानिधी यांचा चष्मा किंवा गांधीजींचा गोल आकाराचा चष्मा, मोदींचं जाकीट हे देखील रजिस्टर होऊ शकतं...नाही का ?

 

 

आणखी वाचा :

ताज हॉटेलचा फोटो वापरल्यास तुम्हांला शिक्षा होऊ शकते बरं...वाचा यामागचं कारण !!!