व्हिडीओ: माणसानं वाघाला जेसीबीखाली दाबून मारलं!!

व्हिडीओ: माणसानं वाघाला जेसीबीखाली दाबून मारलं!!

भाऊ, वाघ म्हणलं की कसं एकदम राजबिंडं रूप समोर येतं.  आता तर म्हणे वाघांची संख्या पण वाढतेय. जंगलात एकदम सेफ असतो वाघ.  आम्ही जातो ना ,ओपन जीपमध्ये बसून त्याला बघायला. लै भारी फीलिंग असतं.  आता तर वाघांनी सवय करून घेतलीय राव माणसाची!!

 पण लै डेंजर जनावर आहे. जंगलाच्या बाहेर निघून माणसांवर हल्लाबिल्ला करतंय. दिलंय नं आम्ही संरक्षित जंगल?  राहावं ना गप्प गुमान. माणसावर हल्ला केला तर काय होत ते बघायचं? बघा मग हा व्हिडीओ..

तर म्हणे जिम कॉर्बेट पार्कच्या ५ किमी अंतरावर, नैनितालजवळ एक वाघ माणसाच्या समोर आला आणि त्यानं डायरेक्ट त्या बाईवर हल्ला चढवला. त्यात त्या बाईचा मृत्यू झाला. आता त्या बाईच्या बॉडीचा ताबा मिळवण्यासाठी आलेल्या गावकरी मंडळीवर वाघानं परत हल्ला केला. त्यात त्या बाईचा सासरा वारला . एवढं सगळं झाल्यावर या वाघाला धडा शिकवायला हवा होताच! वनअधिकारी मंडळी आली आणि त्यांनी वाघाला पकडण्यासाठी चक्क जेसीबीचा वापर केला. या व्हिडीओमध्ये तुम्ही कसं जेसीबीखाली या वाघाला दाबून ठेवलंय ते बघाच. अरे वाघाला वाटलंच काय? या पृथ्वीवरच्या सर्वात हुशार आणि तितकंच खुनशी असलेल्या माणसाची त्याची गाठ आहे.  

तर वनधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की वाघोबा जेसीबीमुळं नाही तर गुंगीचं औषध जास्त झाल्यामुळं दगावले. एकीकडे आपण करोडो रुपये वाघ वाचविण्यासाठी खर्च करत असताना, या वाघाचं पुर्नवसन नक्कीच करता आलं असतं.  पण आपली खुनशी वृत्ती आपल्याला हे करण्यापासून रोखते. मनुष्य आणि वाघ यांच्यातला संघर्ष कसा हाताळायचा हे कळेपर्यंत भारतातले वाघ नामशेष होतील...