पुणे महानगर परिवहन सेवेअंतर्गत वाहतूक करणाऱ्या बसचे महत्व वेगळे सांगण्याची गरज नाही. कोरोनात जेव्हा ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुण्यात बंद होती, तेव्हा खऱ्या अर्थाने तीचे महत्व कळून आले. पण आता पुणे महानगर परिवहन महामंडळ नवीन गोष्ट सुरू करू पाहत आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड भागात काही अंतरापर्यंत चालण्यासाठी पीएमपीएमएल इ-कॅब सेवा सुरू करण्याचा प्लॅन आखत आहे. पहिल्या टप्प्यात १०० ते २०० गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे. महामंडळाकडून ही कॅब सेवा इतर कुठल्याही कंपनी किंवा रिक्षापेक्षा स्वस्त असेल असे सांगण्यात येत आहे.
याच सेवेअंतर्गत पुणे दर्शन किंवा पिंपरी चिंचवड दर्शन करवले जाणार आहे. जेष्ठ नागरिक किंवा दिव्यांग व्यक्तींसाठी ही सेवा अधिक सोयीची असेल. या कॅब सेवेमुळे लोकांचा प्रवासाचा वेळ तसेच प्रवासाचा खर्च पण वाचणार आहे.

