पुण्यात कर्वेरोडवर एका मोठ्या स्क्रीनवर पॉर्न दाखवलं म्हणे..

पुण्यात कर्वेरोडवर एका मोठ्या स्क्रीनवर पॉर्न दाखवलं म्हणे..

अहो, चुकून दाखवले गेले. तर मंडळी, या स्क्रीनचा ऑपरेटर असावा तुम्हां-आम्हांसारखा शौकीन. त्याने इंटरनेट एक्सप्लोरर ब्राउझरमधून एक्स-व्हिडीओज साईट उघडली.  आता बिचारा लपूनछपून  बघत असेल पॉर्न.  पण त्याच्याकडून बहुदा एक चूक झाली आणि चक्क एक्स-व्हिडियो साईट त्या मोठ्या स्क्रीनवर दिसायला लागली. 

या अचानक झालेल्या प्रकारामुळे पुणेकर भंजाळले. पण अशा प्रसंगी एक सुजाण जागरूक पुणेकराने याचा फोटो घेऊन ट्विटरवर टाकला. आज यामुळेच या प्रकरणाचा बोभाटा झाला आहे. 

तर मंडळी, त्या ऑपरेटरकडून झाली तशी चूक तुम्ही करू नका हं.  नेहमी इन्कॉग्निटो म्हणजेच प्रायव्हेट मोड वापरा.  तुम्ही हे काम करेपर्यंत आम्ही वाचकांच्या पत्रव्यवहारासाठी दोन पत्रे लिहून घेतो..