हा फोटो तुम्हाला व्हॉटसऍपवर फॉर्वर्ड होऊन आतापर्यंत नक्कीच आला असेल. बाहेरच्या देशात आपलं शरीर रंगवून रस्त्यावर उभे राहणारे आभासी मानवी पुतळे हमखास पहायला मिळत असतात. ही लोकं अनेकांच्या नजरेला चकवा देत चौकाचौकात अगदी मख्ख उभी असतात. आता खाली दिलेले फोटो नीट बघा.. आणि सांगा तुम्हाला काय दिसतंय ?

कर्नाटकातल्या बेलूर मधलं ’शीलाबालिका’ नावाचं शिल्प जगप्रसिद्ध आहे. ही आहे त्यातलीच एक मानवी प्रतिकृती.

ही आहे शीलाबालिकेची दुसरी मुद्रा. तर सगळ्यात वरती असलेली मूर्ती ही जीवनदायिनी ’कावेरी’ आहे.
आता तुम्हाला हे वेगळं सांगायला नको की तिचा स्पर्धेत पहिला क्रमांक आलाय !
