या डिव्हाईसची खासियत अशी आहे की हे डिव्हाईस जर दुसऱ्या डिव्हाईसच्या तीन मीटर जवळ आले तर त्याला कळून चुकतं की सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाहीये आणि त्यातला अलार्म वाजायला लागतो. हे यंत्र खिशात मावेल इतकं लहान आहे. असं म्हणतात की घड्याळासारखे हे यंत्र मनगटावरही बांधता येईल. वजनालाही हलके म्हणजे जवळपास ३० ग्राम वजनाचंच हे यंत्र असणार आहे.
या यंत्राचा अलार्म वाजताच आपण सोशल डिस्टन्सिंगचा भंग करत आहोत हे कळेल आणि आता दूर जाण्याची गरज आहे हे ही लक्षात येईल. ऑफिस, कारखाने किंवा बाहेर कुठेही याचा चांगला उपयोग होऊ शकतो. हे यंत्र वीजेवर चार्ज करता येते. एकदा चार्ज केले की बारा तास व्यवस्थित काम करते.
कोरोना संकटात रेल्वे खूप जास्त सजगपणे काम करत आहे. याआधीसुद्धा रेल्वेकडून प्रवाशांची स्क्रिनिंग करणारा एक कॅप्टन अर्जुन तयार करण्यात आला होता. उआ स्क्रीनिंगमध्ये कोणाचे तापमान जास्त आहे हे कळत असे. यामुळे कोरोना लक्षणे असलेला प्रवासी ओळखणे सोपे झाले होते.
काही असो, जीवनशैलीत आता काही कायमचे बदल झाले आहेत हे नक्की. आज हा व्हायरस तर उद्या तो.. या सगळ्या प्रकारात सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन हे आता आयुष्यभर मागं लागणार आहे असं दिसतंय खरं!