जुन्या कपड्यांचं आपण काय करतो ? या प्रश्नाचं सोपं उत्तर आहे की नाईलाज होईस्तो ते वापरतच राहतो. म्हणजे आधी रात्री झोपताना नाइट ड्रेस म्हणून वापरतो .नंतर त्याचे तुकडे कापून साफसफाईला वापरतो आणि शेवटी निरुपाय म्हणून फेकून देतो. बर्याच वेळा बोहारणीला जुने कपडे देऊन नवी भांडी वगैरे घेतो. नाहीच तर अनाथाश्रमाला किंवा गरजूंना दान करून पुण्य मिळवतो. हा झाला आपला भारतीय फंडा! विदेशात कपडे जुने झाले की कचर्याच्या कुंडीत जातात आणि तेथून थेट जमीन भरावात म्हणजे लँड फिलींगमध्ये जातात. एकूण फेकलेल्या कपड्यापैकी ८५% कपड्यांची विल्हेवाट या पध्दतीने केली जाते.
या सर्व कपड्यात सिंथेटिक फायबर म्हणजे पॉलिस्टर, रेयॉन सारख्या कृत्रिम धाग्याचा वापर केलेला असतोच, पण सोबत सुती धाग्यांचाही वापर केला असतो. या फेकून देण्याच्या लायकीच्या कपड्यांतून सुती धागा वेगळ करण्याचा 'सर्क्युलोज' या कंपनीने हाती घेतला आहे. आता प्रश्न असा आहे की हे असं का करायचं तर त्यासाठी कापूस ते सुती धागा या प्रवासासाठी किती खर्च येतो ते पाहूया.




