प्रत्येक भारतीयाला आग्र्याचा ताजमहाल माहित आहेच. पण भारतातल्या मॉडर्न शहाजहानच्या ताजमहालबद्दल माहित आहे का? फार क्वचित लोकांना याची माहिती आहे राव. भारतात एक नाही, तर दोन ताजमहाल आहेत. राव, आम्ही ‘बीबी का मकबरा’ बद्दल बोलत नाही आहोत. आम्ही बोलत आहोत ‘कादरी का ताजमहाल’ बद्दल.
‘फैझुल हुसैन कादरी’ हे मॉडर्न शहाजहान म्हणून ओळखले जात होते. ‘ओळखले जात होते’, हे यासाठी की २०१८ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या ८२ व्या वर्षी ते गेले. पण त्यांनी बांधलेला ताजमहाल आजही लोकांसाठी एक उदाहरण म्हणून उभा आहे. चला तर या ताजमहालची गोष्ट वाचूया.. पण त्या आधी हा ताजमहाल कसा आहे ते पाहून घ्या.





