फेसबुक आणि व्हॉट्सऍप बरोबरच आजच्या घडीला सर्वात जास्त जनता कुठे असेल तर ते ठिकाण आहे "इंस्टाग्राम". इंस्टाग्रामच्या मदतीने आज अनेकजण आपली जगासमोर आणत आहेत. जगभरातल्या सेलिब्रिटींनी देखील ‘इंस्टा’ ची निवड केली आहे. मंडळी यात भारतीय सेलिब्रिटी सुद्धा काही मागे नाहीत बरं का.
पण राव, कला, खेळ, राजकारण, फिल्म क्षेत्रातल्या सेलिब्रिटींच सोडा, आज आम्ही तुम्हाला ५ अश्या भारतीयांची ओळख करून देणार आहोत जे चक्क इंस्टाग्रामवरचे सेलिब्रिटी आहेत. ते सेलिब्रिटी का आहेत हे त्यांच्या अकाउंट वरूनच तुम्हाला दिसेल. जर तुम्ही इंस्टाग्रामवर असाल तर या ५ जणांना फॉलो केलंच पाहिजे. पण ते ५ जण आहेत तरी कोण ? चला तर आज आम्ही एक एक करून तुमची गट्टी जमवून देतो.




