विमानच जेव्हा 40 प्रवासी विसरते..

विमानच जेव्हा 40 प्रवासी विसरते..

तुम्ही कधी विमान प्रवाशांना विमानतळावरच विसरून गेल्याचे ऐकले आहे का? नाही ना? मग ही बातमी वाचून तुमचे चांगलेच मनोरंजन होईल. 

स्पाईसजेटचे कोची ते मुंबईहून जाणारे विमान एक दोन नव्हे, तर चक्क 40 लोकांना जमिनीवर सोडून निघून गेले होते. या घटनेमुळे लोक नक्कीच बुचकाळ्यात पडले होते. 


हे विमान मुंबईमध्ये असलेल्या ट्राफिक कंजेशनमुळे आधीच 75 मिनिटे लेट होते. त्यात कोची विमानतळावर जोराचा पाऊस चालू होता. प्रवाशांना टर्मिनलवरून बसने विमानाकडे नेण्यात येत होते. शेवटचे 40 प्रवासी पावसामुळे बसमध्ये अडकून पडले होते. या प्रवाशांना अचानक त्यांचे विमान टेक ऑफ करताना दिसले. एअर ट्राफिक कंट्रोलला विमानाशी संपर्क करून विमान परत वळवायला लागले. या सगळ्या गदारोळानंतर 20 मिनिटाने विमान निघाले.