दोन आठवडे घरात बसून कंटाळलेल्या लोकांसाठी आज आम्ही घेऊन आलो आहोत तब्बल बावीस वर्षं एकांतवासात एकटाच राहणार्या एका माणसाची गोष्ट!
तर या माणसाचं नाव काय? तर त्याला नावच नाही. ब्राझिलमधल्या अॅमेझॉन नदीच्या जंगलात राहणारा एका आदिवासी जमातीचा तो शेवटचा माणूस आहे इतकंच काय ते जगाला माहीती आहे. त्याचं नाव माहिती नसल्याने आपल्या जगातल्या माणसांनी त्याला नाव दिलंय 'मॅन ऑफ द होल'!!



