आता हे सर्वश्रुतच आहे की जगातील अत्यंत जुनी, प्रचंड मोठी आणि पूर्वापार चालत आलेली विश्वसनीय अशी जर सामान वाहतूक व्यवस्था कोणती असेल तर ते ती म्हणजे (सागरी) जलमार्गे वाहतूक व्यवस्था. आणि अशी व्यवस्था मग जागतिक होण्यास असा कितीसा कालावधी लागला असेल? आज जगात लाखो जहाजे आणि करोडो खलाशी या कामात शेकडो वर्षपासून व्यस्त आहेत आणि प्रत्येक देशात शेकडो कंपन्या या व्यवसायात कार्यरत आहेत.
जलमार्गे वाहतुकीचे फायदे म्हणजे एकतर सुरक्षित मार्ग असतो, दुसरा फायदा म्हणजे त्या त्या सामानानुसार तशी विशिष्ट जहाजे उपलब्ध असतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अफाट अश्या क्वांटीटी मध्ये अगदी माफक भाड्यात वाहतूक सहज शक्य असते. हवाईमार्गे ही वाहतूक शक्य असते, आहे, पण त्याची वाहक क्षमता छोटी आणि भाडे जास्त असे असते. त्यामुळे आंतराष्ट्रीय स्तरावर जलमार्गे वाहतूक हीच जास्ती वापरात आणि सहजमान्य आहे.














