लहान शहरातील मोठं टँलेंट : आर. के, मलिक !!

लहान शहरातील मोठं टँलेंट : आर. के, मलिक !!

टँलेंट फक्त मुंबई, पुणे, दिल्ली सारख्या मोठ्या शहरात असतं हा एक मोठा गैरसमज आता हळू हळू मागे पडत चालला आहे. झारखंडमधल्या रांचीसारख्या छोट्या शहरातून आलेला महेंद्रसिंह धोनी सिक्सर मारून भारताला त्याचा वर्ल्डकप जिंकून देत असेल, तर टँलेंट हे सगळीकडे असतं हे सिद्ध होतं. 

मंडळी, याच रांचीमधून आणखी एका व्यक्तीने आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली आहे. याचं नाव आहे ‘आर. के. मलिक’.


स्रोत

आर. के. मलिक हे रांचीमध्ये ‘न्यूटन’ क्लासेस चालवतात. त्यांच्या बुद्धिमत्ता तेव्हा दिसून आली जेव्हा त्यांनी थेट IIT Advance परीक्षेला त्यांची चूक दाखवून दिली. २४ मे २०१७ रोजी IIT Advance च्या गणिताच्या परीक्षेत एक चूक मलिक यांनी शोधून काढली. या परीक्षेतला एक प्रश्न मुळातच चूक होता. यावर IIT वाल्यांनी अशी काही चूक झाल्याचं नाकारलं. पण मलिक यांनी पुन्हा IIT ला या प्रश्नाकडे लक्ष देण्यास सांगितल्या नंतर शेवटी १३ जून रोजी IIT ने आपली चूक मान्य केली. आणि खुशखबर अशी की IIT ने या चुकीबद्दल प्रत्येक विद्यार्थ्याला ४ मार्क्स वाढवून दिले.


स्रोत

मलिक यांनी या आधी अनेकदा IIT परीक्षेतील चुका शोधून काढल्या आहेत. शिवाय आपल्या शिकवण्याच्या सोप्या पद्धतीमुळे ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी १० ते ९९ पर्यंत कोणताही पाढा कसा तयार करायचा याची एक हटके टेक्निक तयार केली आहे. याची एक झलक तुम्ही खाली बघू शकता :

८७ चा पाढा तयार करण्याची सोप्पी पद्धती :

8             7               87
16         14    (16+1)    174
24         21    (24+2)    261
32         28    (32+2)    348
40         35    (40+3)    435
48         42    (48+4)    522
56         49    (56+4)    609
64         56    (64+5)    696
72         63    (72+6)    783
80         70    (80+7)    870

याच प्रकारे ३८ चा पाढा तयार करूया :

3          8               38
6        16     (6+1)    76
9        24     (9+2)   114
12       32   (12+3)  152
15       40   (15+4)  190
18       48   (18+4)  228
21       56   (21+5)  266
24       64   (24+6)  304
27       72   (27+7)  342
30       80   (30+8)  380
33       88   (33+8)  418
36       96   (36+9)  456

९२ चा पाढा :

 9          2           92
18         4           184
27         6           276
36         8           368
45       10      (45+1)460
54       12      (54+1)552
63       14      (63+1)644
72       16      (72+1)736
81       18      (81+1)828
90       20      (90+2)920
99       22      (99+1)1012
108       24    (108+2)1104

आहे की नाही सोप्पं ? आर. के मलिक हे रांचीमध्ये आपल्या या खास टेक्निकने मुलांना शिकवतात. त्यांनी तयार केलेला आणखी एक मस्त गोष्ट म्हणजे गणितांच्या माध्यमातून, कोणत्याही वर्षातील, अमुक तारखेदिवशी कोणता वार होता हे शोधून काढण्याची अगदी सोप्पी टेक्निक. हे आपण त्यांच्याच भाषेत ऐकुया !!

आर. के मलिक यांच्याकडे बघून हे पटतं की टँलेंट कधी लपून राहत नाही बॉस !!!

(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)

©बोभाटा