बापरे, या प्राध्यापकाकडे आहेत चक्क १४५ डिग्र्या?

बापरे, या प्राध्यापकाकडे आहेत चक्क १४५ डिग्र्या?

१९६१ साली चेन्नईत जन्मलेल्या डॉ. व्ही. एन पार्थिबन यांचं व्हिझिटिंग कार्ड पाह्यलंत तर चाटच पडाल. ही म्हणजे धमाल सिनेमातल्या विनय पाठकांच्या नावापेक्षाही लांबलचक अशी त्यांच्या डिग्र्यांची यादीच आहे. 

डॉ. पार्थिबन हे खरेतर कॉमर्सचे प्राध्यापक. पण त्यांना शिकण्याच्या वेडाने झपाटलं आणि आजच्या घडीला त्यांच्याकडे १४५ पदव्या आहेत आणि ही यादी अजून वाढतेच आहे. गोष्ट थोडी  अविश्वसनीय आहे खरी. आता मोजदाद करायचीच तर, त्यांच्याकडे  कॉमर्स आणि इकॉनॉमिक्समधल्या दोन पी. एच. डी. पदव्या,  वेगवेगळ्या १२ संशोधनात्मक पदव्या (एम. फिल), ८ वेगवेगळ्या विषयांतल्या कॉमर्समधल्या पदव्युत्तर डिग्र्‍या (एम. कॉम), ३ वेगवेगळ्या विषयांतल्या सायन्मसधल्या पदव्युत्तर डिग्र्‍या(एम. एस.सी) , ९ बिझनेस मॅनेजमेंट पदव्या(एम. बी. ए) डिग्र्या आहेत. या सोडून आणखी इतर डिग्र्या आहेत ते वेगळंच. 

त्यांचा पुढच्या विविध अभ्यासक्रमांचा अभ्यास चालू असला तरी ते त्याचवेळेस चेन्नईतल्या वेगवेगळ्या कॉलेजांमधून सुमारे १०० विषयही शिकवत आहेत. त्यांच्या दिवसात २४ नाही १०० तास आहेत की काय असा प्रश्न पडल्यावाचून राहावत नाही.