मंडळी मंदिर आणि दारूचा तसा काहीही संबंध नाही. पण थायलंड मधल्या या मंदिराने ते खोटं ठरवलंय. थायलंडच्या ‘खून हान’ जिल्ह्यात असलेलं हे मंदिर चक्क दारूच्या बाटल्यांनी तयार करण्यात आलंय. या मंदिराचं नाव आहे ‘वाट पा महा चेदी काऊ’.
हे एक बौद्ध मंदिर असून त्याच्या कमालीच्या बांधकामासाठी जगभर प्रसिद्ध आहे. राव, तुम्हाला आश्चर्य वाटेल, या मंदिराच्या आवारात असलेले विश्रांतीगृह, बाथरूम आणि स्मशान सुद्धा याच बाटल्यांनी तयार करण्यात आलेत. चला मंडळी या मंदिराबद्दल आणखी जाणून घेऊया पुढील मुद्द्यांच्या आधारे :





