श्रीमंत लोक कधी काय चक्रमपणा करतील याचा नेम नाही आणि ते नाही तर दुसरं कोण करणार हो ? तर आजची गोष्ट अशाच एका व्यक्तीची आहे ज्याने स्वतःची तब्बल चार कोटींची गाडी चक्क खड्ड्यात दफन करायचं ठरवलं.कोण होता हा इसम ?
तर या माणसाचं त्याचं नाव चीकीनो स्कारपा ! हा ब्राझीलचा एक गर्भश्रीमंत प्रसिद्ध उद्योगपती! सप्टेंबर २०१३ मध्ये त्याने जाहीर केलं की त्याच्या अत्यंत महागड्या गाड्यांपैकी एक- 'बेंटले फ्लाईंग स्पर' कार तो घराच्या बागेत दफन करणार आहे.बरं इतकं सांगून थांवायचं ना पण हा गडी सोशल मिडियावर वारंवार येऊन एकच गोष्ट सांगायचा की अमुकतमुक तारखेला मी माझी 'बेंटले फ्लाईंग स्पर' पुरून टाकणार आहे,तुम्हाला उत्सुकता असेल तर तुम्ही पण या कार्यक्रमाला !


