भारतात यावर्षी मार्च महिन्यात ड्रोन नियम तयार करण्यात आले होते. या नियमांवर अनेक ठिकाणांहून टीका झाली होती. यात काही बदल करून सरकारने नवे नियम आणले आहेत. ड्रोन्सचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतूक, शेती, संरक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये ड्रोन्सचा वापर वाढत आहे. आज आपण या ड्रोन नियमांबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत.
नव्या ड्रोन नियमांनुसार विविध कारणांसाठी भारतात ड्रोन वापरणे सोपे झाले आहे. आकाशात लहान ड्रोन उडवण्यासाठी तुम्हाला यापुढे सिक्युरिटी क्लियरन्सची गरज असणार नाही. एवढेच नाहीतर सरकार कार्गो डिलिव्हरीला चालना देण्यासाठी ड्रोन कॉरिडॉर्सची निर्मिती करण्याच्या विचारात आहे.


