राव, दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर आलीय. आता दिवाळीबद्दल आम्ही वेगळं काय सांगणार? पण आज आम्ही तुम्हाला एका आगळ्यावेगळ्या सणाबद्दल माहिती देणार आहोत. हा सण आहे तर दिवाळी सारखाच, पण थोऽडासा हटके आहे. याला तुम्ही नेपाळची दिवाळी म्हणू शकता. नेपाळमधल्या दिवाळीला ‘तिहार’ म्हणतात. दिवाळीप्रमाणे हा सणही पाच दिवस चालतो. पण राव, ‘तिहार जेल’चा आणि याचा काहीही संबंध नाही बरं का!!!
आपल्या इकडच्या दिवाळीपासूनच तिहारची सुरुवात होते. ५ दिवस वेगवेगळ्या परंपरांनी तिहार साजरा केला जातो आणि हीच याची खासियत आहे. आपण एक नजर टाकूया कशा पद्धतीने हा तिहार साजरा होतो.





