गुगल-मायक्रोसॉफ्ट मध्ये जॉब पाहिजे ? मग या एका प्रश्नाचं उत्तर द्याच !!

गुगल-मायक्रोसॉफ्ट मध्ये जॉब पाहिजे ? मग या एका प्रश्नाचं उत्तर द्याच !!

लाखोंचं वार्षिक वेतन आणि चांगल्या पोस्टवर काम करायला कोणाला आवडणार नाही ?? अॅपल, मायक्रोसॉफ्ट, गुगलसारख्या नावाजलेल्या कंपन्यांमध्ये हे एवढं भरगच्च पॅकेज असतं मंडळी. या पोस्टसाठी काय गरजेचं आहे ? शिक्षण ? अनुभव ? नाही.....या पोस्टसाठी तुमच्याकडे हुशारी असणं गरजेचं आहे.

अॅपल किंवा गुगलसारख्या कंपन्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी तुमचं क्वॉलिफिकेशन तुम्हाला मदत करतं. पण नोकरी मिळवण्यासाठी तुमच्याकडे अक्कलहुशारी असणं गरजेचं आहे. कंपनीमध्ये नोकरी मिळण्याआधी अनेक इंटरव्ह्यूमधून जावं लागतं. या इंटरव्ह्यूमध्ये विचारला गेलेला एक प्रश्न सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा प्रश्न असा : ‘तुमच्याकडे दोन अंडी आहेत...ही अंडी तुम्ही किती उंचावरून टाकाल की ती फुटणार नाहीत ? तुम्ही हे कसं कराल ?’

आहे की नाही डोक्याला शॉट? तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तर द्यावं लागतंच, पण ते कसं करणार हे प्रत्यक्षात दाखवावंसुद्धा लागतं. आणि जर उत्तर बरोबर दिलं तर नोकरी लागलीच म्हणून समजा.
लाखो रुपयांच्या नोकरीसाठी एवढा किचकट प्रश्न तर असायलाच पाहिजे ना राव.

बोभाटाच्या वाचकांमध्ये कोणी आहे का जो या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल ? लवकर सांगा कमेंट बॉक्समध्ये !!