ते ‘त्यातले’ नाहीत, पण या दोन पुरुषांनी एकमेकांशी लग्न केलं !!

ते ‘त्यातले’ नाहीत, पण या दोन पुरुषांनी एकमेकांशी लग्न केलं !!

टॅक्स वाचवण्यासाठी कायद्यातील अनेक पळवाटा जगभर लोक वापरत असतात पण 'एल.जी.बी.टी.' म्हणजे समलिंगी विवाहाचा कायद्यातील पळवाट वापरून चव्वेचाळीस लाख रुपये कर वाचवण्याचा अजब प्रकार आयर्लंड मध्ये झाला आहे. मॅट मर्फी (वय ८३) आणि मायकल ओसुलेवन (वय ५८) या दोन पुरुषांनी नुकतेच एकमेकांशी लग्न केलं. आयर्लंड मधील डब्लिन येथे हा लग्न सोहळा पार पडला.

गमतीची गोष्ट अशी हे दोघाही ‘गे’ किंवा ‘समलिंगी’ नाहीत. पण लग्न करण्यासाठी त्यांनी समलिंगी विवाह कायदायचा वापर केला. तसा या दोघांचा ‘दोस्ताना’ अनेक वर्ष जुना आहे. मायकलचं दुसरं लग्न मोडल्यावर तो बेघर झाला. आणि याच दरम्यान मॅटची दृष्टी अधू झाली. यावेळी मायकल मॅटच्या घरी त्याची सेवा करण्यास राहायला होता. उपकरापोटी कायम मॅटच्या घरी राहणं मायकलला पसंत नव्हतं आणि मायकलला पगार देण्याइतके पैसे मॅटकडे नव्हते.

मॅट यांना कोणीही वारसदार नसल्यामुळे त्यांच्या मृत्युनंतर पन्नास हजार पाउंड इतका कर त्यांच्या मालमत्तेतून वसूल करण्यात आला असता. म्हणून दोघांनी लग्न करण्याची शक्कल लढवली. ८३ वर्षाच्या मॅटच्या निधनानंतर आता मायकलला राहते घर वारसा हक्कात मिळेल.

टॅक्स वाचवण्यासाठी कधी कधी दोस्तीही कामाला येते ती अशी !!