पुण्यातल गाडी चालवताय ? मग आधी हे वाचून घ्या राव !!

पुण्यातल गाडी चालवताय ? मग आधी हे वाचून घ्या राव !!

रस्त्याच्या विरुद्ध बाजूने गाडी चालवण्यात काही लोक बहाद्दर असतात राव. काहीजण तर ट्राफिक असला की गाडी सरळ फुटपाथवरून चालवतात किंवा युटर्न घ्यायला नको म्हणून गाडी उलट्या दिशेने फिरवतात. अशा महान, कर्तुत्ववान लोकांना धडा शिकवण्यासाठी पुण्यात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे. हा निर्णय बऱ्याच लोकांची झोप उडवेल.

स्रोत

पुण्यात असे स्पीड ब्रेकर बसवण्यात आले आहेत ज्यांना आपण सोप्या शब्दात ‘टायरचे खुनी’ म्हणू शकतो. म्हणजे तुम्ही सरळ दिशेने गाडी चालवत असाल तर तुमच्या गाडीच्या टायरला काही होणार नाही पण जर तुम्ही विरुद्ध दिशेने गाडी चालवत असाल तर मग तुमचा टायर फुटलाच म्हणून समजा.

‘हडपसर’ मधल्या ‘अमनोरा पार्क टाऊन’ येथे या स्पीड ब्रेकर्सना नुकतंच बसवण्यात आलं आहे. लोकांना माहिती मिळावी म्हणून येथे फलक सुद्धा लावण्यात आलेले आहेत. शिवाय ट्राफिक पोलीस लोकांना मदतही करत आहेत.

स्रोत

एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून व्हिडीओ मध्ये या स्पीड ब्रेकर वरून दबकत जाणारी वाहनं दिसत आहेत. या वाहनांना कसलीच इजा होताना दिसत नाही कारण ते योग्य दिशेने जात आहेत. म्हणजे तुम्ही रस्त्याच्या योग्य दिशेने गाडी चालवली तर तुमच्या वाहनाला कोणताही धोका पोचणार नाही.

भाऊ तुम्ही जर या भागातून जात असाल तर सावधान. कायदे मोडण्याचा विचार केला तर टायर मोडून घेण्याची वेळ येईल हे आधीच सांगून ठेवतो !! बरं ते जाऊदे पण पुण्यानंतर आता पुढचा नंबर कोणत्या शहराचा लागणार ?