आता येतोय आधारचा १६ अंकी व्हर्च्युअल आयडी : काय आहे हा नवीन प्रकार? जाणून घ्या

आता येतोय आधारचा १६ अंकी व्हर्च्युअल आयडी : काय आहे हा नवीन प्रकार? जाणून घ्या

मंडळी वर्षभर जीथे तीथे तुमचं आधार कार्ड लिन्क करून दमला असाल तर आता ही नवीन बातमी ऐका. UIDAI ने आता तुमच्यासाठी एक वेगळा पर्याय आणलाय. यानुसार तुम्ही तुमच्या १२ अंकी आधार नंबरऐवजी याच आधार क्रमांकावर आधारीत १६ अंकी व्हर्च्युअल आयडी क्रमांक बनवून तो आवश्यक ठिकाणी वापरू शकता. काही समजलं नाही? या जरा खोलात जाऊया...

कशासाठी हा व्हर्च्युअल आयडी? 
आतापर्यंत आपल्याला सिम कार्ड, गॅस कनेक्शन, बॅन्क अकाऊंट, आणि अशा अनेक ठिकाणी आपला आधार क्रमांक जोडावा लागलाय. पण कधीकधी होतंय काय की, जीथे जीथे आपण आपला आधार नंबर दिला तीथे आपली संपूर्ण बायोमेट्रिक ओळख साठवली जाते. कदाचित आपल्या या माहितीचा गैरवापर काही कंपन्या आपल्या परवानगीशिवाय दुसर्‍या कामांसाठीही करू शकतात. याचं एक उदाहरण म्हणजे नुकतंच एअरटेलनं आपल्या ग्राहकांचा आधार डेटा वापरून एअरटेल पेमेंट बॅन्केत त्यांची खाती निर्माण केली होती. तेही त्यांच्या परवानगीवीना! दुसरी बाब म्हणजे ही व्यक्तीगत माहिती लिक होण्याची कींवा हॅक होण्याची शक्यताही असतेच.

आपल्या संवेदनशील माहितीचा असा दुरूपयोग होऊ नये म्हणूनच हा व्हर्च्युअल आयडी. जीथे तुमची ओळख मागितली जाते तीथे तुम्हाला आधार क्रमांकाऐवजी हा तात्पुरता असलेला व्हर्च्युअल आयडी द्यायचा आहे. कारण या नंबर मधून फक्त नाव, पत्ता, फोटो, इ. आवश्यक तीच माहिती दिली जाईल आणि तुमची अन्य माहिती सुरक्षित राहील. 

कसा बनवाल आणि कसा वापराल
हा १६ अंकी आभासी क्रमांक तुम्ही १ मार्च पासून बनवू शकता. आणि प्रत्येक ठिकाणी तो १ जून पासून स्विकारला जाईल. तो बनवण्यासाठी तुम्हाला UIDAI च्या वेबसाईटवर जावं लागेल. विशेष म्हणजे हा १६ अंकी आभासी ओळख क्रमांक तुम्ही कीतीही वेळा तुम्हाला हवा तसा नव्याने जनरेट करू शकता. नवीन नंबर निर्माण केल्यानंतर तुमचा जुना व्हर्च्युअल आयडी नष्ट होईल.

तर मंडळी, या नव्या पध्दतीबद्दल तुमचं काय मत आहे? कमेन्ट मध्ये नक्की सांगा.