सुंदर साडी दिसल्यावर ती घ्यायचा मोह होतोच, पण ती नेसायची म्हटलं तर तसा चांगला प्रसंग हवा. मग एकदा नेसलेली साडी परत पुन्हा तेच लोक समारंभात असतील तर नेसता येत नाही. आजकाल साडी हा खास पोषाख आहे, त्यामुळं घेताना चांगल्या क्वालीटीची म्हणजेच महाग असलेली साडीच खरेदी केली जाते. त्यामुळं याचा रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट तसा कमीच.
या वर्षीच्या झी गौरव पुरस्कार सोहळ्यात उर्मिला कानेटकरने घातलेला सिल्क साडीचा इव्हिनिंग गाऊन तुम्ही पाहिला असेलच. तुम्हांलाही जर तुमच्या खास साड्या अशा वेगळ्या प्रकारे उपयोगात आणायच्या असतील, तर आम्ही घेऊन आलो आहोत काही उपाय. पण हो, हे उपाय करण्याआधी चांगला शिंपी शोधा. नाहीतर साडी नाही आणि ड्रेसही नाही, अशी परिस्थिती व्हायची.








