डोक्यावरचे कर्ज वाढते आहे, सगळं काही विकून पैसे द्यायचे म्हटले तरी कर्ज फिटणारच नाही, भविष्यात सगळा अंधारच दिसतो आहे, अशा वेळी सातबार्यावरच्या काही हजारांच्या कर्जासाठी शेतकरी आत्महत्या करतो. हेच ७१,००० कोटी रुपयांचा बोजा जर कंपनीच्या डोक्यावर असेल तर संचालक काय करतात? ते हात वर करून दिवाळखोरीचा अर्ज भरतात, बँका मिळेल ते पैसे घेतात, कंपनी कवडीमोलाने विकली जाते आणि संचालक मोकळे होतात.
एक प्रचंड विरोधाभासाची दरी या दोन चित्रात आपल्याला बघायला मिळते. हे सत्य मांडणारी 'व्हिडिओकॉन' या कंपनीच्या दिवाळखोरीची कहाणी हा आजच्या 'बोभाटा'च्या लेखाचा विषय आहे.









