अपडेट: विजेंदर ने चिनी बॉक्सरला हरवलं ना भौ... आज जिंकलेला टायटल बेल्ट परत घ्या पण बॉर्डर वर येऊन युद्धास भाग पाडू नका असा सल्ला ही दिलाय.
भाऊ, आपण काय बॉक्सिंग बिक्सिंग पाहणारे लोक थोडीच आहोत ? आपण फक्त एकच खेळ पाहतो आणि तो म्हणजे क्रिकेट. पण त्याचं काय आहे, चीन क्रिकेट अजून तरी खेळत नाय आणि सध्या भारताला चीनला कुठं तरी हरवायलाच पाहिजे. तर म्हणूनच आम्ही आज बॉक्सिंग बघणार आहोत.
आम्हाला माहिती आहे हा प्रो-बॉक्सिंग सामना आहे. इथे दोन बॉक्सर लढतात स्वतःसाठी. ऑलिम्पिकसारखं ते काही देशासाठी खेळत नाहीयेत. पण आम्ही याला इंडिया विरुद्ध चायना लढतच मानणार. विजेंदरने तर झुल्फिकारला चायनीज माल जास्त वेळ टिकत नाहीत असे म्हणून चिडवलं पण आहे.
आज होणारी लढत ही डबल टायटल मॅच असणार आहे. WBO आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट टायटल हे विजेंदरकडे आहे तर झुल्फिकारकडे WBO ओरिएंटल सुपर मिडलवेट टायटल आहे. विजेंदरच्या प्रोफेशनल करियर मधली ही फक्त 9 वी फाईट आहे आणि आजवर विजेंदर एकही सामना हारला नाहीए.
आजचा सामना मुंबईत होणार आहे. त्यामुळं अनेक सेलिब्रिटी याला हजेरी लावायची शक्यता आहे. हा सामना आज संध्याकाळी ७ वाजता सोनी टेन १वर दिसणार आहे. सोनी लाईव्हवर तुम्ही या सामन्याचं स्ट्रीमिंग पाहू शकता. चला तर मग, आज आपण विजेंदरला चिअर अप करूयात...
