मच्या सर्वांना व्हाट्सॲपवरती एक व्हिडिओ फॉरवर्ड म्हणून आला असेल. त्यात काही मुलं आपल्या मित्राचा वाढदिवस सेलिब्रेट करताना दिसता. पुढे हे सेलिब्रेशन थोडे वेगळे वळण घेते आणि यात त्या बड्डेबॉयचा जीव जातो. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाढदिवस सेलिब्रेट करताना कशी काळजी घेतली पाहिजे या कॅप्शनसहित वायरल होत आहे.
अनेकदा कॉलेज किंवा इतरही ठिकाणी तरुणांचा बड्डे सेलिब्रेट करण्याचा फंडा थोडा वेगळा दिसतो. यात बड्डेबॉयच्या डोक्यावर अंडी फोडणे, त्याला उलटा करून लाथा घालणे असे किंवा याहून विचित्र प्रकार केले जातात. कापण्यासाठी वेगळा केक आणि एकमेकांना रंगवण्यासाठी वेगळे केक असे चित्र सर्रास दिसते. यावर प्रकारावर अनेकदा टीका होते. काही कॉलेजवयीन तरुण सुद्धा या प्रकाराला विरोध करतात. या सर्वांमध्ये एखाद्याला जबर इजा होण्याचा धोका असतोच. यामुळे हा व्हिडिओ जसा आला तसा लोकांनी तुफान वायरल केला.
या व्हिडिओला वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे कॅप्शन्स देऊन वायरल केले. पण एक गोष्ट सर्वच ठिकाणी सारखी होती, ती म्हणजे हा व्हिडिओ खरा आहे हे प्रत्येकाला पटले होते. कारण तो सीसीटीव्हीत आला आहे असेच बघितल्यावर वाटते. आता तुम्ही म्हणाल मग हा व्हिडीओ खोटा आहे का?
तर उत्तर आहे, हो. अनेक सोशल मीडिया पेजेस जनजागृती करण्यासाठी व्हिडिओ तयार करतात. त्यात एखाद्या विषयाला धरून व्हिडिओ बनवून लोकांमध्ये सकारात्मक संदेश देणे हे त्यांचे काम. आता हा वायरल व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर तिथे इंग्लिशमध्ये स्पष्ट शब्दात लिहिले आहे की, "हा व्हिडिओ फक्त जनजागृतीसाठी बनविला असून हा खरा व्हिडिओ नाही".
तरीही हा व्हिडिओ खरा समजून वायरल होत आहे. बड्डेच्या दिवशी केले जाणारे अनेक प्रकार हे चूक म्हणावे असेच असतात. त्यासाठी या पोरांनी बनविलेला व्हिडिओही जनजागृतीच्या हेतूने भारीच आहे. पण हा व्हिडिओ खरा समजून चांगल्या हेतूने व्हिडिओ बनविणारी पोरी उगाचच व्हिडिओत दिसली म्हणून व्हिलन नको ठरायला म्हणून हा फॅक्ट चेकचा प्रयत्न आम्ही केला आहे. आता हा मेसेज शेअर करून ज्यांना तो व्हिडिओ खरा वाटत असेल त्यांच्यापर्यन्त पोहोचवणे हेच आपले काम आहे.
उदय पाटील
हे पण वाचा!
