नावं ठेवावीत ती पुणेकरांनीच. एरव्हीही पुणेकर अनेकांना नावं ठेवतच असतात. पण निदान देवाला तरी सोडायचं की नाही? पुणेकरांनी देवांनाही अशीच अतरंगी नावं ठेवलेली आहेत. खुन्या मारुती, डुल्या मारुती, भिकारदास मारुती किंवा हाईट म्हणजे गुंडाचा गणपती जो खरोखर गुंडांनी बसवला असं म्हणतात. अशी नावं कुठे सापडतील? अर्थातच पुणे !!
पिनकोड पद्धत सुरु होण्यापूर्वी पुण्यात ठिकाणांची नावे अमुक अमुक देवळाच्या बाजूला किंवा तमुक देवळासमोर अशा स्वरुपाची असायची. कालांतराने पिनकोड पद्धत आली आणि पारंपारिक पद्धत गेली. त्यामुळे या मंदिरांचं महत्व कमी झालं. आजच्या काळात पुण्यातली ही मंदिरं एक ऐतिहासिक वारसा घेऊन उभी आहेत. नावं विचित्र असली तरी त्यांच्यामागे मोठा इतिहास लपला आहे. तो वारसा जपण्याची आज गरज आहे.
राव, पुणेरी पाट्या तर खूप बघितल्या. आज पाहूयात पुण्यातली विचित्र नावं असलेली १५ देवळं..









