सकाळी, दुपारी, रात्री, जेवल्यानंतर, जेवणाआधी, कधीही आणि कुठेही येवू शकते ती म्हणजे ‘शी’ आणि शू’. अशावेळी बाथरूम म्हणजे आपल्यासाठी स्वर्गच असतो. जोराची लागली असल्यावर तर बाथरूमसारखी सुंदर जागाच नाही.
काहींना तर बाथरूममध्ये गाणी सुचतात, नवीन नवीन आयडिया डोक्यात येतात, काही बसल्या-बसल्या भविष्याचं सगळं प्लॅनिंग करतात. मग ही जागा खास का असू नये? मंडळी आम्ही आज घेऊन आलो आहोत जगभरातले काही अतरंगी सतरंगी टॉयलेटस जिथं तुम्हाला निदान एकदा तरी जावसं वाटेल. कदाचित बाथरूमचं महत्व जाणूनच लोकांनी त्याला असं भन्नाट बनवलं असेल.
बघा एकदा तुम्हीच !




















