भारतीय आयुर्विमा निगम म्हणजेच आपली LIC अस्तित्वात आल्यावर देशात आयुर्विमा विकण्याच्या व्यवसायचा फक्त आणि फक्त LIC कडे होता. २००० साली आयुर्विमा क्षेत्राचे खाजगीकरण झाले आणि आताच्या तारखेस २३ खाजगी कंपन्या आयुर्विमा विकत आहेत. देशात विकल्या जाणार्या चारपैकी तीन पॉलीसी LIC च्या असतात. सगळ्या २३ कंपन्यांच्या एकत्र केल्या तरीही LIC त्यांच्या कितीतरी पट मोठी आहे.
आता प्रश्न असा आहे की आपण संपदेचा विचार करताना ही आकडेवारी का वाचायची? तर त्याचं उत्तर असं आहे की विकली जाणारी प्रत्येक पॉलीसी म्हणजे उत्पन्नाचा स्त्रोत असतो. हा उत्पन्नाचा स्त्रोत पुढची अनेक वर्षे वाहात रहाणार असतो. अशा पध्दतीने आजच्या तारखेस LIC स्थावर-जंगम मिळून भारतीया आयुर्विमा मंडळाची किंमत ३० लाख कोटी आहे. ही संख्या पुन्हा एकदा वाचा, ३० लाख कोटी!!! आणि दरवर्षी हा आकडा वाढतच जाणार आहे.
या उत्पन्नाच्या सोबत एलआयसी आयुर्विम्याच्या करारातल्या अटींची पूर्तता करण्यासाठी वचनबध्द पण आहे. त्या जबाबदार्या अशा :







