पारंपारिक बॉम्बहून अधिक भयंकर असलेला 'व्हॅक्यूम बॉम्ब' काय आहे? त्याचे परिणाम अधिक भीतीदायक का आहेत?

लिस्टिकल
पारंपारिक बॉम्बहून अधिक भयंकर असलेला 'व्हॅक्यूम बॉम्ब' काय आहे? त्याचे परिणाम अधिक भीतीदायक का आहेत?

युक्रेन आणि रशिया यांचे जोरदार युद्ध सुरु झाले आहे. रशियन लष्कर आपला सर्व जोर आणि शस्त्रे वापरून युक्रेन काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे. युक्रेनही जोरदार प्रतिहल्ला करत आहे. नुकताच रशियन लष्कराने 'व्हॅक्यूम बॉम्ब' वापरून हल्ला केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. त्यामुळे बरीच खळबळ माजली होती. आज आपण पाहूयात व्हॅक्यूम बॉम्ब म्हणजे काय आणि हा किती परिणामकारक असतो.

'व्हॅक्यूम बॉम्ब' हा २००७ मध्ये तयार करण्यात आला होता. त्याला 'फादर ऑफ ऑल बॉम्ब्स' म्हणूनही ओळखले जाते. हा बॉम्ब जमिनीपासून काही उंचीवर फोडला जातो. याचा स्फोट ४४ टन टीएमटीच्या क्षमतेचा होते. त्याचा स्फोट होताच सुपरसॉनिक स्फोटक लहरी निर्माण होतात. या लहरी सभोवतालचा ऑक्सिजन शोषून घेतात. त्यामुळे आजूबाजूच्या ज्या भागात हा बॉम्ब स्फोट होतो, तेथे लोकांना गुदमरल्यासारखे वाटू लागते आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोक मरतात. 'व्हॅक्यूम बॉम्ब'चा प्रभाव बराच काळ टिकतो. हा बॉम्ब खूप शक्तिशाली आहे. हा अतिशय धोकादायक असून या बॉम्बच्या कक्षेत आल्यावर माणूस अधिक काळ वाचू शकत नाही.

१९६० मध्ये अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन्ही देशांनी थर्मोबॅरिक शस्त्रे बनवली होती. थर्मोबॅरिक शस्त्रांमधील एक प्रकार म्हणजे 'व्हॅक्यूम बॉम्ब'. या बॉम्बसाठी TOS-1 रॉकेट लाँचर वापरतात. रशियन भाषेत TOS म्हणजे उच्च ज्वाला फेकणे. रशियाने २००७ मध्ये याचा उपयोग केल्याचे म्हणले जात आहे. थर्मोबॅरिक शस्त्रे वापरण्यावर आंतरराष्ट्रीय निर्बंध आहेत. अमेरिका आणि रशिया यांनी ती बनवली, परंतु ती कोणालाही विकली नाहीत. आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे ती सार्वजनिकरित्या वापरता येत नाहीत. थर्मोबॅरिक शस्त्रांच्या प्रत्येक युनिटची किंमत १६ मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

व्हॅक्यूम बॉम्ब हे सभोवतालच्या ऑक्सिजनच्या वापरामुळे पारंपरिक शस्त्रांपेक्षा अधिक विनाश घडवून आणतात. ही शस्त्रे प्रथम हवेत फवारणी करतात, ज्यात धातूचे सूक्ष्म कण, ज्वलनशील धूळ किंवा रासायनिक थेंब असतात. व्हॅक्यूम बॉम्ब किंवा थर्मोबॅरिक शस्त्राने आजूबाजूच्या ऑक्सिजनचा वापर करून जास्त तापमान निर्माण करतात. पारंपारिक शस्त्रांच्या तुलनेत ते खूप शक्तिशाली स्फोट करतात. यामुळे हे स्फोट इतक्या शक्तीशाली लहरी निर्माण करतात की मानवी शरीर ताबडतोब वाफेत बदलते. या लहरी शत्रूच्या बंकरमध्ये सहजपणे घुसतात. मग बॉम्बमधील प्रज्वलन स्त्रोत आग निर्माण करतो. ही आग खूप वेगाने पसरते आणि ती एक प्रचंड पोकळी(व्हॅक्यूम) तयार करते. या स्फोटाचा जोर एवढा जास्त असतो की घरांची छतेही उडून जातात, तसेच बंकरही उध्वस्त होतात.

बॉम्ब, मग तो कोणताही असो, विनाशकारी असतोच. यापूर्वी ॲटमबॉम्बने काय हाहा:कार केला होता, त्याच्या स्फोट चाचण्यांचे फोटो आणि प्रत्यक्ष बॉम्ब बनवण्यासाठी कारणीभूत लोकांचे त्याबद्दलचे मत याबद्दलही वाचून घ्या.

अणुबाँबमुळे बेचिराख झालेल्या हिरोशिमाने कशी भरारी घेतली याची गोष्ट?

फोटो स्टोरी : अणूस्फोटाच्या आधीचा फोटो अमेरिकेला का हवा होता? तंत्र उपलब्ध नसताना तो कसा आणि कुणी काढला??

दुसऱ्या महायुद्धातल्या बॉम्बचा तब्बल ८१ वर्षानंतर स्फोट! इतक्या वर्षांनंतरही तो किती शक्तिशाली होता याचा व्हिडीओ पाहा!!

ॲटमबॉम्ब बनवणारे पण उरलेले आयुष्य त्याविरुद्ध प्रचार करणारे ओपेनहायमर!! काय आहे त्यांची गोष्ट?

युक्रेनवर कब्जा करण्यासाठी रशिया आता धोकादायक शस्त्रे वापरत असल्याची भीती इतर देशांनी व्यक्त केली आहे. युक्रेनने रशियावर व्हॅक्यूम बॉम्ब वापरल्याचा आरोप केल्यावर रशियाचे काय म्हणणे आहे हे पाहणे महत्वाचे ठरेल.

शीतल दरंदळे