आता फॅमिली ग्रुपमध्ये 'चुकून' पाठवलेले मेसेजपण डिलिट करता येतील...काय आहे व्हॉटसऍपचं नवं फीचर?

आता फॅमिली ग्रुपमध्ये 'चुकून' पाठवलेले मेसेजपण डिलिट करता येतील...काय आहे व्हॉटसऍपचं नवं फीचर?

भावांनो, व्हॉट्सॲपवर मेसेज डिलीट करण्याचं फिचर येणार म्हणता म्हणता पार केस पांढरे झाले.  पण हे फिचर काही आलं नाही. पण आता गरमागरम बातमी आली आहे की व्हॉट्सॲपवर काही दिवसातच हे फिचर येणार आहे !!!


स्रोत

म्हणजेच आपण पाठवलेला मेसेज आपल्याला डिलीट करता येईल. या फिचरचं नाव आहे “डिलीट फॉर एव्हरीवन” . पण....थांबा.. थांबा. याचे काही नियम आहेत ते सुद्धा जाणून घेतले पाहिजेत भाऊ...

 

डिलीट फॉर एव्हरीवनचे नियम-

१. मेसेज पाठवल्यानंतर ७ मिनिटांतच तो डिलीट करता येईल.

२. जे मेसेज बघितले गेले नाहीयेत, तेच आपण डिलीट करू शकतो.

३. प्रत्येक मेसेज डिलीट केल्यावर तिथे लिहून येणार आहे “This message was deleted” (हे हाय नवीन झेंगाट)

 

डिलीट फॉर एव्हरीवनचे फायदे-

१. पर्सनल मेसेजसोबत तुम्ही ग्रुपमधले मेसेजसुद्धा डिलीट करू शकता.

२. वर्ड मेसेजसोबत व्हिडीओ, फोटोज, GIF, डॉक्युमेंट्स असे सगळेच प्रकारचे मेसेजेस डिलीट करू शकता.


स्रोत

३. हे फिचर वापरण्यासाठी व्हॉट्सॲपचं नवीन व्हर्जन तुम्हाला डाऊनलोड करावं लागेल!!

राव, दिवाळी नंतर का होईना.. पण व्हॉट्सॲपवाल्यांनी आपल्याला बोनस दिलाच. पण भावांनो, मेसेज डिलीट होतो म्हणून गाफील राहू नका. शेवटी एवढंच सांगतो “सावधान रहें.. सतर्क रहें!!!”
काय? चालतंय का?