सहसा महिला आणि पुरुष यांना सगळ्याच ठिकाणी मुक्त प्रवेश मिळत असतो. पण एक ठिकाण असे आहे जेथे पुरुषांना एंट्रीच नाही. ते पण साध्यासुध्या ठिकाणी नाही राव!! चक्क एका बीचवर. हो मंडळी, एका बीचवर फक्त महिलांचे राज आहे. त्या जागेचे नाव आहे सुपरसी आयलँड!! सुपरसी आयलँड फिनलँडच्या बाल्टिक समुद्राजवळ आहे. आयलँडचे ओपनिंग याचवर्षी झाले आहे. जवळपास ९ एकर परिसरात पसरलेले हे बेट ऑस्ट्रेलियातील उद्योजक क्रिस्टिना रॉथ यांनी विकत घेतले कली आहे.
या बाईला पुरुषांशी काय दुष्मनी आहे काय माहित राव!! तिने तिच्या बेटावर पुरुषांना यायला बंदी घातली आहे. हे बेट फक्त महिलांना सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी आणि मनमोकळेपणे मौजमस्ती करता यावी म्हणून बनविण्यात आले आहे.



