मागोवा 2017 : युथक्वेक आहे 'वर्ड ऑफ द इयर', जाणून घ्या ऑक्सफर्ड डिक्शनरीने का या शब्दाला निवडले??

मागोवा 2017 :  युथक्वेक आहे 'वर्ड ऑफ द इयर', जाणून घ्या ऑक्सफर्ड डिक्शनरीने का या शब्दाला निवडले??

ऑक्सफर्ड डिक्शनरी दरवर्षी एका शब्दाची निवड करते.  या वर्षी त्यांनी निवडला आहे युथक्वेक. हा शब्द आपण फारसा ऐकलेला नाहीय.  इतर अनेक पॉप्युलर शब्दांना सोडून ऑक्सफर्डने या शब्दाची निवड केली आहे. 

युथक्वेक म्हणजे काय ?

तरुणांच्या पुढाकाराने घडून आलेला सांस्कृतिक, सामाजिक किंवा राजकीय बदल या हा शब्दाचा ऑक्सफर्डनुसार अर्थ होतो. या शब्द तसा बराच जुना आहे. या शब्दाचा पहिला वापर वोग मासिकाच्या मुख्य संपादक डायना वरिलॅन्ड यांनी १९६५ मध्ये एका सांस्कृतिक चळवळीच्या वर्णनासाठी केला होता. 

मग २०१७ मध्ये काय खास घडलं ?

या वर्षी ब्रिटनमध्ये झालेल्या निवडणूकित लेबर पक्षाच्या बाजूने मिलेनियलसने(८० आणि ९०च्या उत्तरार्धात जन्मलेल्या पिढीला  मिलेनियल्स म्हणतात) तयार केलेल्या वातावरणासाठी वापरला गेला. त्यानंतर सप्टेंबरमध्ये न्यूझीलंडच्या निवडणुकीच्या काळातसुद्धा हा शब्द वापरला गेला. या शब्दाचा वापर अजून मर्यादित असल्यामुळे आपण हा शब्द आपल्याला फार परिचयाचा नाहीए.

हा तर होता इंग्रजीतला वर्ड ऑफ द इयर. पण आपल्या मराठीत कोणता शब्द वर्ड ऑफ द इयर असावा असे तुम्हाला वाटतं ??