या आहेत जगातील ७ सर्वात मोठ्या झोपडपट्ट्या !!

लिस्टिकल
या आहेत जगातील ७ सर्वात मोठ्या झोपडपट्ट्या !!

तात्पुरता निवारा असेल किंवा रोजगारीच्या ठिकाणापासून जवळच असलेलं छप्पर असेल; झोपडपट्टी हा प्रकार फक्त भारतात नाही तर जगभरात बघायला मिळतो. समाजाच्या अगदी खालच्या स्तरातील माणसं इथे पाहायला मिळतात ज्याचं पोट त्या दिवशी मिळालेल्या पैश्यांवर चालत असतं. निर्वासित आणि पोटापाण्यासाठी रोजगाराच्या ठिकाणी जमलेली माणसं आपलं बस्तान ज्या ठिकाणी बसवतात त्याला झोपडपट्टी म्हणतात.

आज आपण बघणार आहोत जगातील ७ सर्वात मोठ्या झोपडपट्ट्या !!

७. रोचीन्हा, ब्राझील.

७. रोचीन्हा, ब्राझील.

ब्राझील मध्ये झोपडपट्टीला ‘फेवेला म्हणतात. जगातल्या सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यापैकी एक आणि ब्राझील मधली सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेली फेवेला म्हणून ‘रोचीन्हा’ ओळखली जाते. रोचीन्हा ब्राझीलची राजधानी ‘रिओ-दे-जेनेरिओ’ शहराच्या दक्षिणेला आहे. या भागात अवैधरीत्या ड्रग्सचा धंदा असल्याने २०११ साली इथे कार्यवाही करण्यात आली होती.

६. धारावी, मुंबई.

६. धारावी, मुंबई.

ब्रिटीशांच्या काळात १८८३ सालापासून धारावीत माणसांची वस्ती तयार होऊ लागली. मुंबईतल्या वाढत्या कंपन्यांनी रोजगाराची नवीन संधी उपलब्ध करून दिल्या पासून लोकांना मुंबई आकर्षून घेऊ लागली. इथूनच देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून मुंबईत पोट भरण्यासाठी आलेले लोक धारावीत आश्रय घेऊ लागले आणि याचं रुपांतर अवाढव्य वस्तीत झालं. काही वर्षांपर्यंत धारावी ही आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी होती.

५. मन्शियत, इजिप्त

५. मन्शियत, इजिप्त

मुंबईच्या धारावीचं इजिप्त मधलं व्हर्जन म्हणजे मन्शियतची वस्ती. आजूबाजूच्या मोठ्या शहरातील कचरा गोळा करून त्यातले धातू, प्लास्टिक वेगवेगळं करण्याचा व्यवसाय या झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या भागाला ‘गार्बेज सिटी’ म्हणून ओळखलं जातं. वीज आणि पाणी सारख्या मुलभूत सेवांचा अभाव इथे दिसून येतो.

४. नेझा-चाल्को-इट्झा, मेक्सिको

४. नेझा-चाल्को-इट्झा, मेक्सिको

नेझा-चाल्को-इट्झा हे मेक्सिकोतल्या सर्वात खतरनाक वस्तींपैकी एक मानलं जातं. गुन्हेगारी गँग्स आणि त्यांचा उपद्रव या भागात मोठ्या प्रमाणात आहे. ड्रग्सचे धंदे, खून, मारामाऱ्या यामुळे ही झोपडपट्टी राहण्यासाठी धोकादायक आहे. प्रत्येक झोपडपट्टीत असतात त्या समस्या इथेही आहेतच. इथे वीज, पाणी, घरे यांची स्थिती आपल्याकडच्या झोपडपट्ट्यांपेक्षा काही वेगळी नाही.

३. किबेरा, केनिया

३. किबेरा, केनिया

आफ्रिकेतली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून किबेराची वस्ती ओळखली जाते. केनिया हा मुळातच तिथल्या गरिबीशी झगडतोय. त्याचं उदाहरणच बघायचं झालं तर किबेराकडे बघता येईल. इथे बेरोजगारी ही मोठी समस्या आहे. किबेरातल्या एका व्यक्तीचं एका दिवसाचं उत्पन्न हे १०० रुपयांपेक्षा कमी आहे. यावरून तुम्हाला अंदाज येईलच. शैक्षणिक मागासलेपण, गुन्हेगारी, एच.आय.व्ही सारख्या रोगांचं प्रमाण इत्यादी प्रश्नाशी किबेरा झगडत आहे.

२. ख्लोंग टोई, बँकॉक

२. ख्लोंग टोई, बँकॉक

बँकॉक सारख्या आलिशान शहराच्या जवळ ‘ख्लोंग टोई’ ही झोपडपट्टी आहे. थायलंडच्या इतर भागातून बँकॉक शहरात रोजगारासाठी आलेल्या माणसांचं आश्रयस्थान म्हणून ख्लोंग टोई च्या झोपड्या वाढत गेल्या. एकीकडे बँकॉक हा थायलंडचा मनाचा तुरा असताना ख्लोंग टोई त्याची काळी बाजू आहे.

माफिया लोकांचा अड्डा म्हणून हा भाग काहीसा बदनाम आहे. इथे राहणारे लोक मोठ्या प्रमाणावर ‘टुक टुक’ (बंकॉची रिक्षा) चालवण्याचा धंदा करतात.

१. ऑरंगी शहर, पाकिस्तान

१. ऑरंगी शहर, पाकिस्तान

पंजाबी, सिंधी, काश्मिरी, पख्तून, बलुच, इस्माईली अश्या अठरापगड लोकांची ऑरंगी शहरात वस्ती आहे. ऑरंगी शहराला पूर्णपणे झोपडपट्टी म्हणता येणार नाही. इथलं राहणीमान सुधारावं म्हणून पाकिस्तानातल्या ‘एनजीओ’नी मिळून ऑरंगी पायलट प्रोजेक्ट सुरु केला. आरोग्य, स्वच्छता आणि राहणीमान सुधारण्याचे यातून प्रयत्न झाले. आणि असं म्हणतात की हा प्रोजेक्ट यशस्वी झाला होता.

 

मंडळी जिथे टोलेजंग इमारती आहे, चमचमती शहरं आहेत, जिथे विकास होतोय, तिथले आणखी एक वास्तव म्हणजे या झोपडपट्ट्या.

 

 

आणखी वाचा :

'चल रंग दे' : झोपडपट्टीच्या गरीबीवर रंगीत मलमपट्टी ??

एका झोपडपट्टीचा कायापालट...वाचा कुठे आहे हे ठिकाण !!!