गायीचे प्रत्येकाच्या मनात एक चित्र असते. देशभर अनेक जातींच्या गायी आहेत. काहींची उंची जास्त असते, तर काहींची मध्यम. पण आज आम्ही ज्या गायीची माहिती सांगणार आहोत, ती वाचून तुम्हाला पण आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
बांगलादेशातील ढाका जवळील चारीग्राम येथे राणी नावाची एक गाय आहे. सध्या तिच्याबद्दल जगभर कुतूहल आहे. ढाक्याला जाणारे पर्यटकही खास करून या गायीला बघायला जात आहेत. आता तुम्ही म्हणाल की या गायीमध्ये काय खास आहे. तर, या गायीचे वैशिष्ट्य म्हणजे ही गाय फक्त ५१ सेंटीमीटर इतक्या उंचीची आहे तर तिचे वजन हे या अवघे २६ किलो आहे.


