७ ऑक्टोबर २०२३ ची सकाळ उजाडली तीच मुळी इस्राईल देशावर हमास या अतिरेकी संघटनेने केलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या बातमीने! यापूर्वी जवळ जवळ २३ वर्षाखाली या भागात हिंसाचार झाला होता तो सप्टेंबर २००० मध्ये. साधारण दर एक काही दशकांमध्ये एकदा तरी या भागात हिंसाचार होऊन इस्राएल आणि पॅलेस्टाइन मधील नागरिक मृत्युमुखी पडत असतात.दक्षिण आशियातील हा भाग गेल्या कित्येक शतकांपासून नव्हे,तर हजारो वर्षांपासून धुमसत आहे.
सध्या गाझा पट्टी मध्ये चालू असलेल्या लष्करी कारवाया आणि एकंदरीत युद्ध परिस्थितीच्या लाईव्ह बातम्या तर दररोज आपल्याला पाहायला मिळतच आहेत, पण त्यामागचा इतिहास फार क्वचित चर्चिला जातो. तो इतिहास आपण या लेखात वाचूया. या भू भागाचा पूर्ण इतिहास अत्यंत सुरस आहे.
इंग्लिश नेते विन्स्टन चर्चिल म्हणाले त्याप्रमाणे “Those that fail to learn from history are doomed to repeat it.” म्हणून हा इतिहास माहित करून घेणे गरजेचे आहे.




