भारतीय लोकसभा किंवा राज्यसभेत गोंधळ होण्याच्या घटनांचं नवल वाटू नये इतकं त्यांच्य्यात सातत्य असतं. गोंधळ घालून सभात्याग म्हणजे अगदी मिळमिळीत की काय, पण प्रसंगी चप्पल फेकून मारणे, माईक/खुर्च्या उचलून फेकणे हे ही होतंच.
अशीच काहीशी घटना तुर्कस्तानातल्या संसदेत घडली. सत्तारूढ पक्षांनी ’कायदेशीर कारवाईविरूद्ध संसद-सभासदांना अभय असू नये’ हा प्रस्ताव मांडला आणि सभासदांनी संसदेचं रूपांतर भांडणाच्या आखाड्यात केलं.
