भारत आणि पाकिस्तानच्या मधून साधा विस्तव तो कसला जात नाही. बॉर्डरवर लढाया होतात, क्रिकेट ग्राऊंडवर पण होतात... आणि आता आपण एकमेकांच्या वेबसाईट्स हॅक करायचाही गेम खेळायला लागलोय.
तर मंडळी, आज दुपारी २:४५च्या दरम्यान ne0-h4ck3rनावाच्या एका ग्रुपने पाकची सरकारी वेबसाईटच हॅक केली राव! तिथं झळकला आपला तिरंगा आणि सुमधुर आवाजातलं जन-गण-मन वाजायला सुरूवात झाली की हो..
दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या बऱ्याचशा वेबसाईट्स हॅक झाल्या होत्या. त्या आधी पाक हॅकर्सनी भारतातल्या आयआयटी दिल्ली आणि वाराणसी, दिल्ली युनिव्हर्सिटी आणि अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी यांच्या वेबसाईट्स हॅक केल्या होत्या. पण आजचे हे हॅक म्हणजे पाकिस्तानला चांगलीच चपराक आहे!!
आता त्यांनी त्यांची वेबसाईट दुरूस्त केलीय, पण जो संदेश त्या हॅकर्सना पाकिस्तानला द्यायचा होता, तो तर पोचला ना भाऊ!!
