सहा वर्षांची धिटुकली पंतप्रधानांना भेटली;पंतप्रधाननरेंद्र मोदी म्हणतात,'काही अनमोल क्षण वैशालीसोबत'

सहा वर्षांची धिटुकली पंतप्रधानांना भेटली;पंतप्रधाननरेंद्र मोदी म्हणतात,'काही अनमोल क्षण वैशालीसोबत'

या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मार्ट सिटीच्या निमिताने पुण्यात आले होते. त्यांच्या भेटीगाठीच्या यादीत एक नाव होते वैशाली यादवचे . या सहा वर्षाच्या चिमुरडीने काही महिन्यांपूर्वी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी मदत मागितली होती. वैशालीच्या भाषेत सांगायचे तर "मोदी सरकार"ने ताबडतोब पुणे जिल्ह्याच्या अधिकार्‍यांना कामाला लावून वैशालीचा शोध घेतला. वैशाली पुण्यातल्या रायगड कॉलनीत एका खोलीत आपल्या आजी आणि बाबांसोबत राहते. सरकारी अधिकार्‍यांनी ताबडतोब पुण्याच्या प्रख्यात रुबी हॉलमध्ये शस्त्रक्रियेची व्यवस्था केली आणि २ जून रोजी ही शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडली. त्यानंतर वैशालीने "मोदी सरकार"ला आभाराचे पत्र आणि सोबत एक चित्रपण जोडले होते.

या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी वैशालीला पुण्यात भेटले. त्यानंतर मोदींनी आपल्या ट्वीटवर म्हटले " काही अनमोल क्षण वैशालीसोबत "