काय घड्तंय अफगाणीस्तानमध्ये ? जाणून घ्या - काबूल एक्सप्रेस भाग १
अनेक साम्राज्यांचे कब्रस्तान अफगाणीस्तान- वाचा : काबूल एक्सप्रेस भाग -२
अफगाणिस्तानात तालिबानचं राज्य स्थापन झालंय.तालिबानचे सैनिक राजधानी काबूलच्या सीमेवर थांबले होते. त्यांना काबूलमधे जावंच लागलं नाही. अफगाणिस्तानचे अध्यक्षच सरकार आणि काबूल सोडून पळून गेले.झाडावरचं फळ अगदी अलगदपणे तालिबानच्या हातात पडलं.
१९९६ साली सिविल वॉरनंतर तालिबानचं सरकार अफगाणिस्तानात स्थापन झालं होतं.सरकार स्थापण्याला अमेरिकेनंच मदत केली होती, शस्त्र पुरवली होती.ओसामा बिन लादेननं अफगाणिस्तानात तळ स्थापला आणि २००१ साली न्यूयॉर्कमधले जुळे मनोरे उडवले.अमेरिकेनं ओसामा बिन लादेनवर आणि त्याला थारा देणाऱ्या तालिबान सरकारवर कारवाई केली.२००१ मधे तालिबानचं सरकार पडलं आणि अमेरिकेच्या मदतीने अफगाणिस्तानात संमिश्र सरकार स्थापन झालं. तेव्हां पासून तालिबाननं अफगाण सरकारशी गनिमी युद्ध आरंभलं होतं. वीस वर्षाच्या खटपटीनंतर तालिबाननं पुन्हा सत्ता हाती घेतली आहे.




