सगळं काही व्यवस्थित चाललं असतं .अचानक एखादा मेसेज येतो - कोणीतरी फोन करतं आणि कळतं की आपल्यापैकीच कोणालातरी कॅन्सर असल्यावे वैद्यकीय निदान झाले आहे. सुरुवातीला या बातमीवर विश्वासच बसत नाही कारण अगदी धडधाकट -निरोगी माणसाला आपण भेटत असतो- नियमित संपर्कात असतो.मग एकच प्रश्न मनाला छळत राहतो की यांना आधी हे कळलं नसेल का ? पाठोपाठ दुसर प्रश्न उभा राहतोच की आज आपण एकदम ओक्के आहोत, उद्या असंच काही आपल्याला.......?
गेल्या काही वर्षात अशा प्रकारे चोरपावलांनी कर्करोगाचे आगमन होण्याचे प्रमाण वाढत जात आहे.वरवर पाहता ठणठणीत असलेली तब्येत अचानक ढासळायला सुरुवात होते.आजच्या आपल्या लेखात कर्करोगाच्या अशाच काही लक्षणांचा विचार करणार आहोत ज्यामुळे योग्य वेळीच उपचाराला सुरुवात करता येईल.







