ज्याला आपण आता फक्त 'स्प्रे' म्हणतो त्याला शास्त्रीय भाषेत एरोसोल स्प्रे म्हणतात.आता घरोघरी वापल्या जाणार्या 'स्प्रे'चा शोध आणि त्याचे पेटंट १९२६ साली एरीक रॉथीम या नॉर्वेत राहणार्या केमीकल एंजीनियरला मिळाले.अमेरीकेत याचे पेटंट त्याला मिळाल्यावर त्याने १००००० क्रोनर्समध्ये विकले.१९९८ साली या संशोधकाच्या गौरवार्थ नॉर्वेच्या पोस्टाने एक पोस्टेज स्टँप काढला.

