एका विचित्र अपघातात २९००० फूटावरून काही सेकंदातच जमिनीवर कोसळले हे विमान !

लिस्टिकल
एका विचित्र अपघातात २९००० फूटावरून काही सेकंदातच जमिनीवर कोसळले हे विमान !

चायना इस्टर्न एअरलाइन्सचे एक विमान,गंतव्यस्थानाच्या विमानतळापासून  काहीच अंतरावर असताना अचानक एखाद्या दगडासारखे थेट जमिनीवर कोसळल्याची बातमी आहे. विमानातील १३२ प्रवासी प्राणाला मुकले आहेत.विमानाचे अपघात होत असतात पण ग्वांग्झू शहराकडे निघालेले हे विमान तसे नेहेमी प्रमाणेच उड्डाण करत होते आणि अचानक सरळ एका रेषेत सूर मारल्यासारखे कसे कोसळले याचे सर्व तज्ञांना आश्चर्य वाटते आहे.

विमानतळापासून १०० किलोमीटर अंतरावर -आकाशात २९०००  फूट उंचीवर असताना- फ्लाइट MU5735 एका क्षणात  कोसळले. सर्वसाधारणपणे विमानतळ इतक्या अंतरावर असताना पायलट लँडींगच्या तयारीत हळूहळू कमी उंचीवर आणत असतो. अपघात झाला तरी विमान हेलकावे खात खात कमी कमी उंचीवर येऊन कोसळते. पण हे विमान अक्षरशः काही सेकंदातव कसे कोसळले हे गूढ आहे.२६००० फूटापासून पुढे केवळ ९५ सेकंदात विमान जमिनीवर कोसळले. त्या अगोदरच कॉकपीट आणि फ्लाइत डेटा रेकॉर्डर बंद पडला होता.  737-800 बनावटीचे विमान असे कधीच कोसळत नाही.

NTSB  च्या तज्ञांच्या मते हे विमान वैमानीकाने आत्मघातकी प्रयत्नानेच पाडले असावे.पण उपलब्ध असलेल्या माहितीवरून हा निष्कर्ष काढणे असेही NTSB च्या एका तज्ञाने म्हटले आहे.पायलटला अचानक हार्ट अटॅक येऊन त्याचे डोके कंट्रोल पॅनेलवर आदळल्याने किंवा विमानाचे नाक वर घेणार्‍या मोटर्स बंद पदल्यानेही असे घडू शकते. 

घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या खाणीत काम करणार्‍यांनी हे शेवटचे क्षण टिपले आहेत . सध्या हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.