कुलूप आणि किल्ली ही जोडी जरी आकाराला छोटीशी असली तरी या जोडीने आपले आयुष्य खूपच सुसह्य केले आहे. एकदा का कुलूप लावले आणि किल्ली सुरक्षित ठिकाणी ठेवली तर आपण निर्धास्तपणे कुठेही जायला मोकळे. पण एवढ्याशा कुलपात इतकी भन्नाट सिस्टीम कशी आहे ज्यामुळे त्याच चावीशिवाय ते उघडणे कठीण होऊन जावे, हा प्रश्न कायम आपल्याला सतावत असतो. आज त्याचेही उत्तर जाणून घेऊ.
अतिशय सोप्या पण तितक्याच भन्नाट मार्गाने हे कुलूप उघडले जात असते. आमचा प्रयत्न हा आपले नेहमीचे कुलूप आत कसे काम करते हे सांगण्याचा आहे. तसे तर कुलपांचे अनेक प्रकार आहेत पण आज आपल्या साध्या सोप्या कुलूपाबद्दल समजून घेऊ.




