आज १५ मे म्हणजे 'जागतिक खगोलशास्त्र दिवस'. या दिवसाची सुरुवात १९७३ साली डॉ. डग बर्जर यांनी केली. सर्वसामान्य लोकांच्या मनात अवकाशाबद्दल, आपल्या अनंत विश्वाबद्दल कुतुहूल निर्माण करून त्यांना जास्तीतजास्त माहीती द्यावी असा या यामागचा उद्देश आहे. फरक इतकाच आहे की जागतिक खगोलशास्त्र दिवस दरवर्षी दोनदा साजरा केला जातो. एकदा एप्रिल आणि मेच्या मध्यात तर दुसर्यांदा सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या मध्यकाळात. तर या वर्षीचा दुसरा खगोलशास्त्र दिन ९ ऑक्टोबर २०२१ रोजी असेल. गेल्या वर्षी हाच 'जागतिक खगोलशास्त्र दिवस' २ मे रोजी होता आणि यावर्षी तो १५ मे रोजी का आहे याचा उलगडा आधी करून घेऊ या. हा दिवस शुक्ल पंधरवड्याच्या म्हणजे अमावस्या ते पौर्णिमा या तिथींच्या दरम्यान पहिल्या सप्ताहात साजरा केला जातो म्हणून या तारखा बदलतात.
बोभाटाचा २०२०चा खगोलशास्त्राचा विशेष लेख इथे वाचायला मिळेल.




